झोपेचा फायदा घेत भंगार विक्रेत्याचे ९४ हजार रुपये लंपास

खेड:- खेड बसस्थानकात विश्रांती करण्यासाठी झोपलेल्या एका प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या बॅगेतील ९४ हजार ५०० रूपये लंपास केले. या प्रकरणी बुधवारी सायंकाळी उशिरा अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद अ. ऐसान खान (७७, रा. उंबरशेत-दापोली) यांनी याबाबत तक्रार दाखल केली. तें भंगार गोळा करून विक्री करतात. ११ जून रोजी रात्रीच्या सुमारास येथील बसस्थानकात विश्रांतीसाठी थांबले होते. त्यांच्या ताब्यातील काळसर-निळसर रंगाची बॅग डोक्याखाली ठेवून झोपले होते. ते झोपले असल्याचा संधी साधत चोरट्याने बॅग लंपास केली. बॅग चोरीस गेल्याचे लक्षात येताच पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली.