जिल्ह्यात साडेदहा हजार विद्यार्थी करणार शिक्षणाचा श्री गणेशा

रत्नागिरी:– नव्या 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव’साठी फक्त एक दिवस बाकी राहिला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग सारेच त्यासाठी आतुर झालेले आहेत. यावर्षी 10 हजार 571 नवागतां जिल्हा परिषदाया प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणा श्रीगणेशा होणार आहे. यावर्षासाठी ‘मोफत गणवेश’ योजनेतून विद्यार्थ्यांना शाळाया पहिल्या दिवशी मिळणाऱया गणवेशाबाबत अजूनही प्रश्नािान्ह उभे आहे.

येत्या शनिवार 15 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाचा जि.प.स्तरावर प्रारंभ होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभाग जय्यत तयारीत गुंतला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी 2 हजार 494 शाळांमध्ये प्रवेशोत्सव राबविण्यात येणार आहे. यावर्षी पहिलीच्या वर्गात नवागतां प्रवेशोत्सव करून घेण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी जि.प. शिक्षण विभागामार्पत मोफत पाठय़पुस्तकों वाटप केले जाणार आहे. जिह्यात मोफत पाठय़पुस्तक योजनेंतर्गत 1 लाख 4 हजार 156 विद्यार्थ्यांसाठी 1 लाख 7 हजार 84 पुस्तकसां उपलब्ध शाळास्तरावर देण्यात आले आहेत.
येत्या 15 जूनला नव्या वर्षात जिल्ह्य़ात इ. 1 लीमध्ये 10 हजार 571 मुले प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये 5356 मुलगे व 5215 मुलां समावेश आहे. शाळाया मोफत पाठय़पुस्तके, वितरण केले जाणार आहे. त्याबरोबर शाळा प्रवेश दिंडी आयोजन, शिक्षणी पालखी मिरवणूक, दाखलपात्र मुलीं वाजतगाजत मिरवणूकीने स्वागत, त्या सर्वांना गोड खाउााs वाटप असे आनंददायी कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

मोफत गणवेश योजनेचा इ. 1 ली ते 8 वी च्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व मुली, अनु.जाती मुलगे, अनु.जमाती मुली व बीपीएल मुलगे यांना समग्र शिक्षा अंतर्गंत लाभ देण्यात येतो. सन 2023-24 करता शाळेच्या पहिल्या दिवशी पात्र मुलांना गणवेश दिला जातो. पण अजूनही शासनाकडून त्याविषयी योग्य निर्देश न आल्याने शिक्षण विभागही संभ्रमात आहे.