खेडशी येथे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी विदेशी मद्य प्राशन करणाऱ्या संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण रवींद्र पानवलकर (२९, रा. खेडशी-लोहारवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ९) रात्री सव्वा आठच्या सुमारास खेडशी येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित पानवलकर हे सार्वजनिक ठिकाणी विदेशी मद्य प्राशन करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.