किर्तीनगर येथे दुचाकी अपघातात दोघे जखमी

रत्नागिरी:- शहरातील विमानतळ ते कोकणनगर येथील किर्तीनगर बसस्टॉप येथे दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. शहर पोलिस ठाण्यात संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक दिलीप आग्रे (वय २४, जांभरुण, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १) सायंकाळी कीर्तीनगर येथील रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आग्रे हे दुचाकी घेऊन रत्नागिरीहून मजगाव रस्त्याने जात असताना दुचाकी निष्काळजीपणे चालवून कीर्तीनगर रस्त्यावर येथे दुचाकीला डाव्या बाजूला धडक दिली. यामध्ये दीपाली प्रकाश जाधव (वय ४२, रा. महादेव नगर विमानतळ जवळ, रत्नागिरी) या जखमी झाल्या. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.