वंदे भारत, तेजस एक्सप्रेस आजपासून तीनच दिवस धावणार

खेड:- कोकण मार्गावरून धावणाऱ्या सुपरफास्ट सीएसएमटी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेससह तेजस एक्स्प्रेस १० जूनपासून ऑक्टोबरअखेरपर्यंत आठवड्यातून ३ दिवस धावणार आहे. पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार असल्याने हा बदल झाला आहे.

२२२२९/२२२३० क्रमांकाची सीएसएमटी मुंबई- मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून ६ दिवस चालवण्यात येते तर २२११९/२२१२० क्र.ची सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस आठवड्यातून ५ दिवस चालवण्यात येते. मात्र, कोकण मार्गावर १० जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार असल्याने वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवारी धावेल. सीएसएमटी येथून सकाळी ५.२५ वा. सुटून त्याचदिवशी दुपारी ३.३० वा. मडगाव येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात दर मंगळवार, गुरूवार व शनिवारी धावेल. मडगांव येथून सकाळी १२.२०वा. सुटून त्याचदिवशी रात्री १०.२५ वा. सीएसएमटी मुंबई स्थानकात पोहचेल. सीएसएमटी मुंबई- मडगाव तेजस एक्सप्रेस पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार, गुरूवार व शनिवार धावणार आहे.