प्रादेशिक मनोरुग्णालयातील वृद्ध महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- मुख्य दंडाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशान्वये मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या अनोळखी वृद्ध महिलेची ऑक्सिजन पातळी कमी झाली. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनोळखी महिला शम्मी अम्मा (वय ७४, पुर्ण नाव पत्ता माहित नाही. सध्या प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. शम्मी अम्माला मुख्य दंडाधिकारी यांच्या आदेशाने २२ जून १९७० ला मनोरुग्णालयात दाखल केले होते. २८ मे २०२४ ला तिची ऑक्सिजन पातळी कमी व अंगाला सुज आल्याने येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान शुक्रवारी (ता. ७) रात्री दीडच्या सुमारास तिचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला.