दाभोळे बाजारपेठेत ट्रक-बोलेरोची धडक

देवरूख:– रत्नागिरी‚ कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे बाजारपेठेनजीक ट्रक आणि बोलेरो यांच्यात शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

मात्र अपघातात बोलेरो गाडीचे नुकसान झाले आहे. दोन्ही मार्गावरील वाहतूक एकेरी मार्गाने चालू होती. घटनास्थळी हातखंबा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे एपीआय विक्रम पाटील, दाभोळे मृत्युंजय दूत ग्रुपचे प्रतिनिधी काका हिरवे, दीपक कांबळे, अब्बास तोडगे, पोलीस पाटील यशवंत सुकम व स्थानिक नागरिक उपस्थित होते. वाहतुकीचे नियमान पोलीस मदत केंद्र व मृत्युंजय दूत ग्रुप यांच्यावतीने करण्यात आले.