पावस बसस्थानक समोर एस्टी बसला डंपरची धडक

पावस:- पावस बसस्थानक समोर रस्त्यावर उभे असलेल्या एसटी बसला एका डंपर ने ठोकर दिल्याने एसटीचे काही प्रमाणात नुकसान झाले मात्र प्रवाशांना कोणतीही इजा पोचली नाही. ही घटना गुरुवारी (ता. ६) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली.

एसटी बस प्रवाशांकरिता थांबली होती. प्रवाशांचे चढणे उतरत असताना पावस उत्तरावरून लांजा मार्गावरून एक डंपर चिरे भरून कुर्धे येथे जात असताना वाहनावरील ताबा सुटल्यामुळे व ब्रेक न लागल्याने उभे असलेल्या एसटीच्या मागील बाजूला धडक दिली. यामध्ये एसटीच्या दोन खिडक्या तुटल्या आहेत. मात्र यामध्ये एसटी प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही