नासाला जाण्यासाठी जिल्ह्यातून 20 विद्यार्थ्यांची निवड

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेमार्फत यावर्षी देखील जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अतरांतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी नासा (अमेरिका) येथे सफर घडविण्यात येणार आहे. त्यासाठी यावेळेस जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या चाळणी परिक्षेत एकूण 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व विद्यार्थी येत्या जूनाया पहिल्या आठवडय़ात नासा भेटीसाठी रवाना होणार आहेत. या विद्यार्थ्याना आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

नासा व इस्त्रो या अभ्यास दौऱयासाठी जिल्हा परिषद शाळास्तरावर 251 केंद्रांवर 20 हजार 511 विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षा घेण्यात आली होती. त्यातून एकूण 55 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. त्यातील 20 मुले नासा साठी निवडली गेली आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नासा व इस्त्रो भेटीसाठी जि.प.प्रशासनस्तरावर केंद्रस्तरावर विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षा घेण्यात आली होती. त्यातून नासा-इस्त्रो संस्थांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच सर्वतोपरी सहकार्य दिलेले आहे.

नासा भेटीसाठी निवड झालेले विद्यार्थी येत्या 5 ते 17 जून असा दौरा करणार आहेत. त्यांयासोबत जिल्हा परिषदेतील अधिकारी, शिक्षक अशी 6 जणीं टिम राहणार आहे. या भेटीवर जाण्यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांना आज 29 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलावण्यात आले आहेत. तेथे जिल्हाधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

निवड झालेले विद्यार्थी तालुकानिहाय
‡नासा व इस्त्रो भेटीसाठी निवडलेले विद्यार्थीः
मंडणगड-ओम शैलेश कोबनाक (केंद्र शाळा देव्हारे), आक्षा संदिप आग्रे (केंद्रशाळा चिंचघर), दापोली-मानिनी मंगेश आग्रे (जि.प.शाळा मळे), शुभम जयंत जोशी (जि.प.शाळा कोळथरे), खेड- सार्थक प्रकाश महाडिक (जि.प.शाळा धामणदेवी बेलवडी), किर्ती केशव मुंढे (जि.प.शाळा असगणी नं.2), चिपळूण- दक्ष दिनेश गिजये (जि.प.शाळा पाग मुलांची), इच्छा सिताराम कदम (जि.प.शाळा अनारी), गुहागर- विराज विष्णू नाचरे (जि.प.शाळा पाभरे), पूर्वा उमेश जाधव (जि.प.शाळा पिंपर नं.1), संगमेश्वर- प्रसाद सतीश धामसेकर (केंद्रशाळा डिंगणी, गुरववाडी), स्वराज दिलीप पाक्तेकर (जि.प.शाळा डिंगणी, खाडेवाडी), सिध्दी भिमराव पाटील (छ.शिवाजी आदर्श विद्यामंदिर देवरुख नं.4), रत्नागिरी- ऋषभ गौतम गायसमुद्रे (कुवारबाव महालक्ष्मीनगर शाळा क्र.2), श्रेया संदीप आग्रे (जि.प.शाळा कोळीसरे नं.1), लांजा- प्रणव लक्ष्मण कोलगे (प्राथमिक शाळा जावडे क्र.1), सुमेध सचिन जाधव (आदर्श शाळा शिरवली), राजापूर-जस्लिन फैय्याज हाजू (जि.प.शाळा खरवते नं.1), शर्वरी सुघोष काळे (प्राथमिक शाळा गुजराळी), शमिका संतोष शेवडे (प्राथमिक शाळा कोतापूर नं.1).