साडवलीचा पार्थ ब्रीद बोर्डात पहिला

कोकण बोर्डात प्रथम क्रमांक पटकावणारा प्रशालेचा पहिला विद्यार्थी

देवरूख:- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेत प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित कै. सौ.मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ केतन ब्रीद याने 100% गुण मिळवून घवघवीत यश संपादन करत राज्यात कोकण विभागात पहिला क्रमांक पटकावत शाळेसह तालुक्याचे नाव राज्यात चमकवले.

कै. मीनाताई ठाकरे हायस्कूल साडवलीचा सलग अठराव्या वर्षी 100% निकाल लागला. प्रथम क्रमांक प्राप्त कु. पार्थ केतन ब्रीद याने 100% गुण मिळवून कोकण बोर्डात प्रथम येण्याचा मान पटकावला. त्याचे वडील केतन ब्रीद हे याच विद्यालयात शिक्षक आहेत.
विद्यालयातील प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थीः-कु. पार्थ केतन ब्रीद, कु. मधुरा मंदार मांगले, कु. नुपूर दिनेश भुरवणे, कु. दया संदिप पवार, कु. स्वानंद संजय नटे.

विद्यालयाने सलग अठराव्या वर्षी 100% निकालाची परंपरा राखली आहे. एकूण 62 विद्यार्थ्यापैकी 16 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळाले व 35 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उतीर्ण झाले. तसेच 11 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. विद्यालयाच्या सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक गणेश जोशी, जितेंद्र यादव, सौ. विशाखा सोमण, सौ.मीना कोळपे, अनंत गिड्ये, केतन ब्रीद, निलेश भुरवणे, समीर यादव यांचे संस्थाध्यक्ष रविंद्र माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे व कार्याध्यक्षा सौ. नेहा मान व संस्था पदाधिकारी, स्थानिक सल्लागार समिती सदस्य, ग्रामस्थ, पालक तसेच मुख्याध्यापक बी. व्ही. नलावडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कोकण बोर्डात प्रथम क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल पार्थचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.