कोचिवली-भावनगर रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

चिपळूणः– तालुक्यातील सावर्डे रेल्वेस्थानक परिसरात कोचिवली-भावनगर या रेल्वेगाडीची धडक बसून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रुपेश राजाराम पवार (35, खेरशेत) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश पवार हा कोचिवली भावनगर या एक्स्पेस रेल्वेगाडीच्या अचानक समोर आला. त्याला रेल्वेची धडक बसून यात तो जखमी झाल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला.