रत्नागिरी शहरातील १९२ होर्डिंग्जचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

रत्नागिरी:- मुंबई घाटकोपर येथे होर्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रत्नागिरी नगर परिषदेला देखील जाग आली आहे. शहरात असलेल्या १९२ होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तत्काळ सादर करा अशी नोटीस नगर परिषदेने होर्डींग मालकांना बजावली आहे.

सोमवारी मुंबई येथे झालेल्या वादळी पावसात घाटकोपर येथे भलेमोठे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. या दुर्घटनेत शंभर जण या होर्डिंगखाली गाडले गेले. यात अनेकजणांना मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर रनप प्रशासन जागे झाले आहे. मंगळवारी नगर परिषद प्रशासनाने शहरातील होर्डिंग बाबत आढावा घेतला. शहरात सद्यस्थितीत १९२ अधिकृत होर्डींग असल्याची नोंद नगर परिशदकडे आहे. याशिवाय अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डींग देखील उभारण्यात आले आहेत.

मंगळवारी तातडीने नगर परिषद प्रशासनाने सर्व होर्डिंग मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. आपल्या होर्डींग सद्यस्थितीत कशा आहेत याचे स्त्रक्राल ऑडिट करून तत्काळ याबाबत नगर परिषद प्रशासनाला अहवाल सादर करा अन्यथा नगर परिषद प्रशासनाकडून कडक कारवाई कण्यात येईल अशा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. स्टॅक्चरल ऑडिट करण्यासाठी नगर परिषदेने संबंधित मालकांना मुदत दिली असून या मुदतीत स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.