नाचणेत महिला दुचाकीस्वाराची पादचारी वृद्धाला धडक

रत्नागिरी:- शहराजवळील नाचणे-सुपलवाडी येथील रस्त्यावर दुचाकीवरुन जाणाऱ्या अज्ञात महिलेने पादचारी वृद्धाला धडक दिली. अज्ञात महिलेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. २) सकाळी साडेदहाच्या सुमारास नाचणे-सुपलवाडी रस्त्यावर बाईंग स्टॉप येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी वृद्ध शरद तुकाराम सावंत (वय ७५, रा. नाचणे शांतीनगर, रत्नागिरी) हे नाचणे-सुपलवाडी ते बाईंगस्टॉप असे चालत जात असताना संशयित महिला दुचाकी घेऊन जात असताना काजरघाट दिशेकडून येणाऱ्या सफेद रंगाच्या दुचाकीवरिल महिलेने सावंत यांना मागून धडक दिली व न थांबता निघून गेल्या. या अपघातात सावंत यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.