अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू

रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील पालशेत येथे बागकाम करणाऱ्या विवाहितेने विषारी औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान मंगळवारी (ता. १४) पहाटे चारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. सुजाता सुधीर पवार (वय २७, रा. कोळकेवाडी-चिपळूण) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १३) घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुजाता व तिचे पती सुधीर पवार हे गुहागर पालशेत येथे माधव सुर्वे यांच्या बागेत कामाला होते. सोमवारी सुजाता हिने कोणत्यातरी अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले होते. तिला तातडीने कामथे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.