हातखंबा येथे डंपर टेम्पोवर पलटी होऊन अपघात; दोघे जखमी

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गुरववाडी येथे मंगळवारी सकाळी 10.30 वा. सुमारास माती वाहतूक करणार्‍या डंपरने समोरून येणार्‍या टेम्पोला जोरदार धडक देत अपघात केला.या अपघातात टेम्पोतील दोघेजण जखमी झाले असून दोघांवरही जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टेम्पा चालक निलेश साळुंखे (वय 30, रा. नांद्रे ता. मिरज, सांगली) आणि गणेश कोळी (वय 30, रा. नांद्रे ता. मिरज, सांगली) अपघातातील दोन्ही जखमींची नावे आहेत. मंगळवारी सकाळी निलेश साळुंखे आपल्या ताब्यातील टेम्पो

(एमएच-09-एफएल-4068) घेउन मिरजला जात होते. त्याचा सुमारास (एमएच-30-बीडी-4214) वरीत अज्ञात चालक डंपर चालक पाली ते रत्नागिरी असा येत होता. ही दोन्ही वाहने हातखंबा गुरववाडी येथे आली असता डंपरने विरुद्ध दिशेला जाऊन या टेम्पोला जोरदार धडक दिली. या डंपरमध्ये ओवर लोड माती भरलेली होती. ही धडक इतकी जोराची होती की, त्यामुळे डंपर टेम्पोला धडकला ही आणि टेम्पोवरच पलटीही झाला. या अपघातात टेम्पो चालक निलेश साळुंखे व गणेश कोळी हे दोघेजण आतमध्येच अडकून पडले होते. अपघात झाल्यानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळताच श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज नाणीज धाम येथील रुग्णवाहिकेचे चालक बाळू केतकर यांच्यासह हातखंबा टॅबवरील वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले. टेम्पोत अडकलेल्या दोघांना हि स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.