दुचाकीवरील ताबा सूटून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील धारतळे येथे दुचाकी समोर अचानकपणे बैल आल्याने झालेल्या अपघातात चालक गंभिर जखमी झाला आहे. अपघाताची ही घटना शुक्रवार 10 मे रोजी सायंकाळी 7 वा. घडली. सुरेश रंगराव चव्हाण (50, रा.धारतळे लांजा, रत्नागिरी) असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. शुक्रवारी सुरेश चव्हाण आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच -08-एडी- 8815) घेउन नाटे येथे दुकानाचे सामान खरेदी करण्यासाठी गेले होते.

दुकानाचे खरेदी केलेले सामान घेउन ते नाटे ते धारतळे असे परतत होते. सायंकाळी 7 वा. सुमारास गोवर्धनी फाट्याजवळ दुचाकीसमोर अचानकपणे बैल आडवा आल्याने त्यांचा दुचाकीवरील ताबा सूटून हा अपघात झाला. या अपघातात सूरेश चव्हाण यांच्या डोक्याल गंभिर दुखापत झाल्याने त्यांना प्रथम धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेउन अधिक उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांना पुढील उपचारांसाठी चिरायू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.