राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत काळे भगिनींचा डंका; दोघींकडून सात सुवर्ण पदकांची कमाई

रत्नागिरी:-  रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत रत्नागिरीतील काळे बहिणींनी दैदिप्यमान यश मिळवले. या राज्यस्तरीय स्पर्धेत श्रुती काळे हिने तीन सुवर्ण पदकांची तर ओवी काळे हिने चार सुवर्ण पदकांची कमाई केली.

रत्नागिरीत राज्यस्तरीय ओपन स्टेट तायक्वांडो क्योरुगी आणि पूमसे चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन, रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन आणि युवा तायक्वांडो मार्शल आर्ट रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा २९, ३० एप्रिल आणि १ मे रोजी रॉयल बँक्वेट हॉल रत्नागिरी येथे घेण्यात आली. या स्पर्धेत राज्यभरातील सातारा, मुंबई, पुणे, सांगली आदी नामांकित जिल्ह्यातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.

या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत रत्नागिरीतील काळे बहिणींनी मोठे यश संपादन केले. श्रुती संतोष काळे हिने बेस्ट फायटर सह फ्री स्टाईल पूम्से ( छोटा गट) या प्रकारात वयक्तिक गोल्ड मेडल, फ्री स्टाईल पूम्से ( छोटा गट) जोडी गटात गोल्ड मेडल आणि ४२ किलो पर्यंत वजनी गटात देखील गोल्ड मेडल जिंकले. तसेच ओवी संतोष काळे हिने बेस्ट फायटरसह फ्री स्टाईल पोम्से ( sub junior) गटात वयक्तिक गोल्ड मेडल, फ्री स्टाईल पोमसे ( sub ज्युनिअर) जोडी गटात गोल्ड मेडल, नॉर्मल पुमसे गटात ( सब ज्युनिअर) गोल्ड आणि २९ किलो पर्यंतच्या गटात देखील गोल्ड मेडल जिंकत रत्नागिरीची मान उंचावली. काळे बहिणींच्या या उज्ज्वल यश बद्दल दोघींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.