मांडवी समुद्रकिनार्‍यावर आढळला मृत व्हेल मासा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मांडवी बंदर परिसरात भरतीच्या पाण्याबरोबर एक भला मोठा व्हेल मासा मृत अवस्थेत समुद्रकिनार्‍यावर आला. या मृत माशाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत मासे समुद्रकिनार्‍यावर आले आहेत. व्हेल मासा मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे का? हा संशोधनाचा विषय असला तरी मच्छिमार बांधव मात्र याबाबत चिंता व्यक्त करीत आहेत. समुद्रात खोलवर मोठे जहाज मार्गक्रमण करीत असतात त्यावेळी व्हेल माशाला धोका निर्माण होण्याचीही शक्यता असते. ज्यावेळी एखादे जहाज मार्गक्रमण करताना व्हेल मासा देखील जहाजाबरोबर पोहण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यावेळी जहाजाच्या पुढे लावण्यात आलेले पाते त्यांच्या जीवाला धोका निर्माण करतात. शिवाय जहाजाच्या मागे असणारे पंखे देखील धोकादायक असतात. अलिकडच्या काळात वरवडे, गणपतीपुळे येथे मृत व्हेल मासे सापडले होते.