आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

रत्नागिरी:- बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेद्वारे जिल्ह्यात इ. 1 ली साठी एकूण 12 हजार 336 विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेश मिळणार आहे. जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या 2 हजार 431 शाळांमध्ये या प्रवेश प्रकियेला मंगळवार 16 एपिल पासून प्रारंभ झाला असून ही प्रवेश प्रकिया 30 एपिलपर्यंत चालणार असल्याचे जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एम.कासार यांनी सांगितले आहे.

आरटीई 25 टक्के अंतर्गंत मोफत शाळा पवेश 2024-25 साठी ऑनलाईन पवेश अर्ज करण्याची पकिया ‘स्टुडंट डॉट महाराष्ट्र डायट जीओव्ही डॉट इन’ या संकेत स्थळावर आरटीई पोर्टल / ऑनलाईन ॲप्लीकेशन या टॅबमध्ये सुरू झालेली आहे. जिल्ह्यात 2 हजार 431 शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केली आहे. यावर्षी इंग्रजी माध्यम शाळां व्यतिरिक्त जिल्हापरिषदेच्या सर्वच शाळांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. गतवर्षी 2023-24 मध्ये 936 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (आरटीई) दरवर्षी आर्थिक दुर्बल घटकांतील 25 टक्के बालकांना विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. पण आता नवीन बदलानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक कि.मी. अंतरावर शासकीय किंवा खासगी अनुदानित शाळा नाही, त्यांना मात्र खासगी इंग्रजी शाळांचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. मात्र यावर्षी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे.

आता तीन किलोमीटरच्या अंतरात जी शाळा असेल तेथे प्रवेश घ्यावा लागणार आहे. यावर्षी शासनाने महानगर पालिका शाळा, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत शाळा, कॅन्टोमेंट बोर्ड शाळा, जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद (माजी शासकीय), महानगर पालिका, (स्वयंअर्थसहाय्यित), पोलिस कल्याणकारी शाळा (विना अनुदानित) या शाळांचा समावेश आहे. आता शाळांची नोंदणी केल्यानंतर आता प्रत्यक्षात ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
आरटीई 25 टक्के राखीव पवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे व इतर बाबीःजन्मतारखेचा पुरावा.जातीचा दाखला आवश्यक (परराज्यातील जातीचे व उत्पन्नाचे पमाणपत्र अपात्र)
उत्पन्नाचा पुरावा-आर्थिक दुर्बंल घटकातील विद्यार्थ्यांना पालकांचे रु.1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला आवश्यक आहे. सन 2024-25 मध्ये पवेश घेताना विद्यार्थ्यांना पालकांचा सन 2022-23 किंवा 2023-24 या वर्षांचा उत्पन्न दाखला ग्राह्य धरण्यात येईल. उत्पन्नाच्या दाखल्याची पडताळणी महा ऑनलाईनच्या पोर्टलद्वारे आŸनलाईन पध्दतीने करण्यात येईल.उत्पन्नाचा दाखला म्हणून तहसिलदारांचा दाखला, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लायर चा दाखल गृहीत धरता येईल.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शल्यचिकीत्सक / वैद्यकीय अधिक्षक, अधिसूचित जि.शा.रुग्णालयाचा 40 टक्के किंवा त्यापेक्षा जासत दिव्यांग असल्याचे पमाणपत्र.निवासी पुराव्यासाठी रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज/टेलिफोन देयक, आधारकार्ड, पासबुक, मतदान ओळखपत्र आदी.