मिरजोळे येथे पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे येथे पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार 17 एप्रिल रोजी सायंकाळी 4.15 वा. घडली आहे. मोरेश्वर अनंत पाटील (36,रा.मिरजोळे पाटीलवाडी,रत्नागिरी) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

बुधवारी सायंकाळी मोरेश्वर पाटील हा नेहमीप्रमाणे आंघोळ करण्यासाठी मिरजोळे गावातील गणपती विसर्जन कोंड येथे गेला होता. त्याठिकाणी खोल पाण्यात गेल्याने त्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.