पोलिओचे उच्चाटन, सेव एन्व्हायरमेंटसाठी रत्नागिरीत सायकल रॅली

रत्नागिरी:- पोलिओ उच्चाटन आणि सेव एन्व्हायरमेंटसाठी रत्नागिरीत सायकल रॅली काढण्यात आली. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिटटावून आणि चेन्नईहून आलेले रोटेरियन सतीश व अँन संकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी सायकलिस्ट क्लब तर्फे पोलिओ उच्चाटन आणि सेव एन्व्हायरमेंट हा उद्देश घेऊन मारुती मंदिर, साळवी स्टॉप, राम माळी, टिळक आळी मार्गे मांडवी बीच पर्यंत सायकल रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये 30 सायकलिस्ट व वीस रोटरी परिवारातील सदस्य सहभागी झाले होते. मारुती मंदिर सर्कल येथून या सायकल रॅलीला सुरुवात झाली. रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष बिपिनचंद्र गांधी यांनी प्रास्ताविक केले. तसेच रोटे सतीश यांनी आपल्या 30 दिवसातील प्रवासाचे अनुभव शेअर केले. या कार्यक्रमाचे नियोजन रोटे सिताराम सावंत यांनी केले. यावेळी रोटरी परिवारातील समीर इंदुलकर, राजेंद्र कदम, प्रसाद खेडेकर, केदार माणगावकर, दिगंबर मगदूम, संजीव सुर्वे व इतर परिवारातील सदस्य उपस्थित होते.

रॅलीची सांगता मांडवी येथे करण्यात आली. यावेळी रोटरीच्या प्रथेप्रमाणे दोन क्लब मध्ये फ्लॅग एक्सचेंज समारंभ सुद्धा करण्यात आला. पोलिओ संदर्भातील आपल्या तीस दिवसांच्या प्रवासात विविध शाळांमधून आलेले अनुभव अँन संकरी यांनी शेअर केले.