राज्य किशोरी संघात रत्नागिरीची स्वरांजली कर्लेकर

पश्चिम विभागीय खेलो इंडिया स्पर्धा ; मुंबई लालबाग येथे स्पर्धा

रत्नागिरी:- भारतीय खेल प्राधिकरण, भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्यावतीने २० ते २१ मार्च २०२४ या कालावधीत पश्चिम विभागीय खेलो इंडिया खो-खो लीग १४ व १८ वर्षाखालील किशोरी व मुली गटातील स्पर्धा मुंबई लालबाग येथे होत आहे. यासाठी महाराष्ट्राचा संघ जाहिर झाला असून १४ वर्षांखालील संघात रत्नागिरीच्या स्वरांजली कर्लेकरची निवड झाली आहे. हे संघ राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव ॲड. गोविंद शर्मा यांनी जाहीर केले.

महाराष्ट्र किशोरी संघाच्या कर्णधारपदी सांगलीच्या वैष्णवी चाफेची तर मुली गटाच्या कर्णधारपदी धाराशिवच्या सुहानी धोत्रेची निवड झाली आहे. पश्चिम विभागीय खेलो इंडिया महिला खो-खो लीगसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे १९ मार्च रोजी लालबाग, मुंबई येथे राष्ट्रीय स्पर्धापूर्व सराव शिबिर होणार आहे. यंदाच्या हंगामामध्ये महाराष्ट्राच्या खो-खो संघाने राष्ट्रीयस्तरावर सुवर्णमय कामगिरी केली आहे. राष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राच्या संघांचा असलेला दबदबा हे दोन्ही संघ पश्चिम विभागीय स्पर्धेमध्येही कायम राखतील असा विश्वास राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईकनिंबाळकर, खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, सचिव अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. अरुण देशमुख यांच्यासह माजी सचिव संदिप तावडे यांनी व्यक्त केला आहे. राज्य संघात निवड झालेल्या स्वरांजली कर्लेकर हिने राज्यस्तरीय स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली आहे. तिला राष्ट्रीय प्रशिक्षक पकंज चवंडे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे संघ पुढीलप्रमाणे: किशोरी संघ: वैष्णवी चाफे (कर्णधार, सांगली), मुग्धा वीर, मैथिली पवार, मुग्धा सातपुते, राही पाटील (धाराशिव), वेदिका तामखडे (सांगली), भवरम्मा उटगी (सांगली), श्रावणी तामखडे (सांगली), कल्याणी लामकाने (सोलापूर), धनश्री लव्हाळे (पुणे), अपर्णा वर्दे (पुणे), स्वरांजली कर्लेकर (रत्नागिरी), प्राची भुजबळ (परभणी), हेतल पाटील (जळगाव), अक्षरा चोले (बीड), संघ प्रशिक्षक अतुल जाधव, व्यवस्थापक वर्षा मोरे. मुली संघ: सुहानी धोत्रे (कर्णधार), अश्विनी शिंदे, प्रणाली काळे, तन्वी भोसले (सर्व धाराशिव), नयन काळे, धनश्री तामखडे (दोघीही सांगली), दीपाली राठोड, पूर्वा वाघ (दोघेही पुणे), स्नेहल लामकाने, साक्षी ढेपे (सोलापूर), अथश्री तेरवणकर (मुंबई), सलोनी पवार (मुं. उपनगर), वैष्णवी भावलं (छ. संभाजीनगर), दिव्या गायकवाड (ठाणे), हर्षदा कोळी (धुळे), संघ प्रशिक्षक आकाश पाटील, व्यवस्थापक श्रीमती कविता परब.