नमन, जाखडी नृत्यकलेला लोककलेचा दर्जा देण्याचा निर्णय: ना. सामंत

रत्नागिरी:- कोकणातील विशेषत रत्नागिरी जिल्हातील नमन (खेळे), शक्तीतुरा (जाकडीनृत्य) या लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवाशीय जोपासत आहेत. मात्र दशावताराप्रमाणे या नमन लोककलेला मानाचे स्थान प्राप्त झाले नाही. पण आता शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या यादीत नमन आणि जाकडीनृत्य या दोन्ही लोककलांना स्थान मिळाल्याचे राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले

नमन आणि जाकडीनृत्य या येथील लोककलांकडे आधुनिकतेप्रमाणे सध्या या लोककलेकडे व्यावसायिक दृष्टिकोणातून पाहिले जात आहे. त्याचे रुपही बदलत आहे. पारंपरिक पद्धतीत आधुनिकतेची भर पडली आहे. कोकणात नमन, जाकडी च्या संवर्धनासाठी येथील नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संघटनेमार्पत, कलावंत, मंडळांकडून सातत्याने मागणी होत आहे. या लोककलांना शासनदरबारी राजाश्रय मिळावा अशी मागणी आहे. त्यासाठी जिल्ह्dयाचे पालकमंत्री उदय सामंत हे देखील सातत्याने पयत्नशील राहिलेले आहेत. नुकताच रत्नागिरीत पथमच नमन लोककलेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नमन महोत्सव पार पडला.

कोकणात या कलेला जनाधार असतानाही शासन या कलेकडे दुर्लक्षच झालेले होते. पण आता नमन महोत्सवाच्या रुपाने या लोककलेची त्यातील कलावंतांची दखल घेण्यात आली आहे. कलेच्या बाबतीत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. पायभूत सुविधा उपलब्ध करून देणे, पुरस्कार देणे, अर्थसहाय्य देणे यातून सरकार विविध कलांना प्रोत्साहन देते आहे. लोककला टिकवण्यासाठी ‘लोककलांची माहिती संकलन आणि संशोधन’ शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्पत कार्य चालते. शासनाकडे 60 लोककलांची यापूर्वी यादी बनवण्यात आलेली आहे.

लोककला आणि लोककलाकार यामध्ये कोणाचा समावेश करायचा याची मार्गदर्शक तत्वे, राज्यातील लोककलांची माहिती संकलन होत असते. धार्मिक, पारंपरिक अधिष्ठान असलेल्या भक्तीनाट्य, प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक कलांचा समावेश त्यात आहे.’ कोकणभूमीत अनेक कलांचा विकास झाला आहे. त्यामध्ये नमन(खेळे), शक्तीतुरा (जाकडीनृत्य), आदी कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषत रत्नागिरी जिल्हातील नमन (खेळे) या लोककलेची प्रसिध्दी जगभर पसरली आहे. नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवाशीय जोपासत आहेत.

रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, मंडणगड या तालुक्यातील लोकांनी या लोककला व लोकनृत्य यातून प्राचीन कोकणच्या संस्कृतीचे जतन संवर्धनाचे काम अविरत सुरू ठेवलेले आहे. यापुढे ही या लोककलांचे जतन होणे काळाची गरज आहे. काळ बदलला मात्र ग्रामीण जनतेच्या मनोरंजनाचे साधन मात्र नमन-खेळे, शक्तीतुरा हेच असल्याचे पकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे या लोककलाची शासनस्तरावरून घेण्यात आलेली दखल या कलेतील कलांवंताना नवी उर्जा देणारी ठरली आहे. त्यामुळे या लोककलांना राजाश्रय मिळण्यासाठी सुरू असलेल्या पयत्नांना हळू हळू यश मिळू लागले आहे.

या नमन आणि जाकडी लोककलांची शासनाच्या लोककला यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाकडून या लोककला व त्यांतील कलावंतांना मिळणारे सर्व लाभ यापुढे मिळण्यास मोलाची मदत होणार आहे.
उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा