माकडांचा, वानरांचा उच्छाद थांबण्यासाठी अ‍ॅक्शन प्लान तयार

रत्नागिरी:- खरीप हंगमाबरोबरच रब्बीत कृषी उत्पदनांची हानी करण्याबरोबरच फलोत्पदानाला हानीकारक ठरणार्‍या माकडांचा आणि वानरांचा उच्छाद थांबण्यासाठी आता अ‍ॅक्शन प्लान तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या 15 दिवसात रत्नागिरी तालुक्यातील पावस गोळप पंचक्रोशतीन करण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजनमदुन निधीला मान्यता देण्यात आाली असून योजनेच्या यशस्वीतेेनंतर ही योजना जिल्हाभर राबण्यात येणार आहे.

वानरे, माकडे बागायतीमध्ये नासूधस करतात याबाबत माकडांचा आणि वानरांचा बंदोबस्त करण्यासाठी निधीला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा प्रायोगिक आरंभ पावस येथील बागायतीतून होणार आहे. शेतीबागायतीसाठी उपद्रव ठरत असलेली वानरे, माकडे पकडून अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

वानरे, माकडांमुळे दरवर्षी शेती, बागायतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. माकडे फळांची नासधूस करत असल्याने अनेक बागायतदारांनी केवळ याच कारणामुळे बागायत सोडली आहे. तसेच खरीप हंगमाताही माकडांच्या उच्छादनानेै शतेकरी हैराण आहेत. त्यामुळे काही भागात कुंपणाची शेती केली जात होती यामध्ये जुन्या साड्यांचा वाप कुंपण करण्यासाठी केला जात होता. तसेच काही भगात शेतकर्‍यांनी ताही आपल्यापरीने उपाय केले. माकडांना पळविण्यासाठी काही भगात रबरी गोळ्यांचा वापर करण्यात येत होता. मात्र, तो तकलादू असल्याने लागू पडला नाही. तर काही भागात माकडांना पळविण्यासाठी कृत्रिम बंदुकांचाही वापर करण्यात येत होता. मात्र, त्यामध्ये सातत्य नसल्याने मकडांचा त्रास कमी होत नव्हता.

याबाबत शेतकर्‍यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत तसेच माकडे पकण्याचे प्रशिक्षण देण्याची तयारही कृषी विभागाने केली होती. मात्र, ही बाब खर्चक असल्याने ही योजना अमलात आणली गेली नाही. अखेर आता माकडांच्या बंदोबस्तासाठी प्रायोगिक तत्वावर योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील अविनाश काळे यांनी वानरे तसेच माकडांच्या उपद्रवाबाबत सातत्याने आवाज उठवला आहे. त्यासाठी उपोषणही केले आहे. वानरे, माकडे पकडून अभयारण्यात सोडण्यासाठी लागणार्‍या निधीचा प्रस्ताव वन विभागाने दिला होता.
रत्नागिरी तालुक्यात खर्च पाहून उर्वरित तालुक्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. काळे यांनी केलेल्या आंदोलनानंतर या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.