चिरेखणीवरील आठ हजार रुपये किमतीच्या केबलची चोरी

रत्नागिरी:- तालुक्यातील चाफे कातळवाडी येथील चिरेखाणीवरील मशिनची 8 हजार रुपये किंमतीची केबल अज्ञाताने लांबवली. ही घटना रविवार 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते सोमवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वा.कालावधीत घडली आहे.

अंकुश पांडूरंग तांबे (33, रा.निवेंडी धनगरवाडा, रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अंकुश तांबे यांची चाफे कातळवाडी येथे चिर्‍याची खाण आहे. तेथील मशिनला जोडलेली 8 हजार रुपये किंमतीची 6 मी.मी व्यासाची 200 मीटर केबल अज्ञाताने लांबवली. याबाबत अंकुश तांबे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञातावर भादंवि कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.