वेरळ येथे ट्रक- दुचाकी अपघातात उद्यमनगर येथील तरुणाचा मृत्यू

खेड:- मुंबई गोवा महामार्गावर वेरळ या ठिकाणी हॉटेल गणपती कृपा समोर ट्रक आणि दुचाकी मध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात जागीच ठार झालेला तरुणाचे नाव आतिफ सोलकर असे असून तो रत्नागिरी येथील उद्यमनगर येथे राहणारा आहे.

हा अपघात पावणेतीन वाजण्याच्या सुमारास झाला यातील ट्रक हा गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता तर दुचाकी ही खेडहून रत्नागिरीच्या दिशेने जात होती. हॉटेल गणपती कृपा च्या समोर असणाऱ्या डायव्हर्सनमुळे ट्रक आणि दुचाकी चा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी स्वराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. दुचाकी सुधा ट्रकच्या खाली अडकून 20 ते 25 फूट त्या ट्रकने दुचाकीला अक्षरशः फरपटत नेले होते.

हा अपघात झाल्यानंतर मदत ग्रुपचे प्रसाद गांधी तसेच वेरळ येथील स्थानिक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली, या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला होता. महामार्ग बांधकाम विभागाच्या चुकीच्या पद्धतीने दिलेल्या डायवर्षणमुळे व कोणत्याही प्रकारच्या सूचनाफलक नसल्यामुळे असे अपघात वारंवार होत आहेत याबाबत लोकांमध्ये मोठी चीड निर्माण झाली आहे.

<