प्रादेशिक मनोरुग्णालयातील वृध्देचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- प्रादेशिक मनोरुग्णालयातील वृध्देचा आकस्मिक मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना शनिवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.50 वा.घडली.

मिनाक्षी (62) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. या वृध्द महिलेला सीजीएम कोर्ट सांगली येथून प्रादेशिक मनोरुग्णालयात 3 नोव्हेंबर 2020 रोजी दाखल करण्यात आले होते. 8 फेब्रुवारी रोजी तिला हायपरटेंशन आणि डाबेटिजचा आजार असल्याने तिला बरे वाटत नसल्याने प्रादेशिक मनोरुग्णालयातील स्टाफ रोशनी किंजळे व गौरी माटल यांनी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना तिचा शनिवारी सकाळी उपचारांदरम्यान मृत्यू झाला.