जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त 1 हजार 752 जागा लवकरच भरणार

रत्नागिरी:- शिक्षक भरतीसाठी वर्षभरापूर्वी फेब्रुवारी-मार्च दरम्यान टीएआयटी परीक्षा झाली होती. पण भरती प्रक्रिया सुरू होण्याची पतिक्षा डीएड., बीएड धारक उमेदारांना लागून राहिलेली होती. पण आता शासनाकडून संकेतस्थळावर राज्यात शिक्षक भरतीची जाहीरात पसिध्द झाल्याने जिल्ह्यातील शिक्षक भरतीसाठी पतिक्षेत असलेल्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात रिक्त असलेल्या 1 हजार 752 जागांवर शिक्षक मिळणार आहेत.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरती विभागस्तरावर करण्याचे आश्वासन विधीमंडळाच्या मागील अधिवेशनात दिलेले होते. केसरकर यांनी पहिल्या टप्प्यात राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती करण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या जूनच्या 15 तारखेपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करून नवीन शिक्षक पहिल्या दिवशी शाळेत रूजू होतील, असे माध्यमांसमोर सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात नव्या शैक्षणिक वर्षाचा पारंभ होत असताना शाळांना शिक्षक मिळालेले नव्हते. त्यामुळे या भरतीसाठी टीएआयटी परीक्षा दिलेल्या डीएड., बीएड धारक उमेदवारांना पतिक्षा लागून राहिलेली होती. या भरतीसाठी उमेदवारांचे रजिस्टेशन करून त्यांची माहिती भरून घेण्याचे काम शिक्षण विभागस्तरावरून झालेले होते.
रत्नागिरी जिह्यातील 725 हून अधिक शिक्षकांच्या सरसकट आंतरजिल्हा बदली केल्यामुळे यंदाच्या वर्षी जिह्यातील 161 शाळांमध्ये शिक्षकांअभावी मोठा गोंधळ उडाला. पुर्वी पटसंख्या नाही म्हणून शाळा बंद पडत. आता गुरुजी नाहीत म्हणून शाळा बंद पडण्याची वेळ उभी ठाकली. शून्यशिक्षकी शाळांची संख्या 161 वर पोहोचल्यामुळे त्या शाळेतील शिक्षणाचा बट्ट्याबोळ उडाल्यानंतर शिक्षण विभागाला त्या शाळांवर शिक्षकांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती.
रत्नागिरी जिह्यातील शिक्षकांच्या सरसकट आंतरजिल्हा बदली केल्यामुळे जिह्यात शिक्षकांच्या सुमारे 1752 जागा रिक्त आहेत. विभागीय शिक्षक भरती झालीच पाहिजे, विभागीय भरतीचा शासन निर्णय निर्गमित करा, स्थानिकांची टक्केवारी (70-30 टक्के) जाहीर करून त्यांना न्याय द्या, यासाठी जिल्ह्dयातील डीएड्, बीएड्धारकांनी धरणे आंदोलन केले होते. मात्र शासनाकडील ठोस कार्यवाहीची या उमेदवारांना पतिक्षा लागून राहिलेली होती. पण आता राज्यात 21 हजार 678 शिक्षकांची पदभरती करण्याची जाहीरात शासनाच्या संकेतस्थळावर झळकली आहे. त्यामुळे उमेदवारांचे पाधान्यकम नोदंवण्याला पारंभ झालेला आहे. उमेदवारांना 8 फेब्रुवारीपर्यंत हा पाधान्यकम नोंदवता येणार आहे.