रत्नागिरी:- तालुक्यातील उक्षी येथे सरपंचांच्या विरोधात जाऊन सर्व सदस्यांनी राजिनामा दिल्यानंतर आता निवडणूक जाहीर झाली असून 15 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
उक्षी येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांना विरोध म्हणून सर्वच सदस्यांनी राजिनामा दिला होता. तत्पूर्वी सरपंचांना काढण्यासाठी अनेक नाट्य घडली होती. परंतु आता या उक्षी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून, 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 यावेळेत मतदान होणार असून 16 फेब्रुवारी रोजी निकाल घोषित होणार आहेत. मतमोजणीचे ठिकाण जिल्हाधिकार्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करणार आहेत.
ही ग्रामपंचायत शिवसेना शिंदे गटाकडे होती. सरंपच व सदस्यांच्या आपापसातील मतभेदांमुळे राजिनामा नाट्य घडले होते. त्यामुळे या निवडणुकीत आता कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. यातील दोन जागा या बिनविरोध झाल्या आहेत.