भाई नेरुरकर राज्य खो-खो स्पर्धा 4 पासून सांगलीत

राज्यातील 40 संघांचा सहभाग; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते उद्घाटन

सांगली:- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांची मान्यतेने होणारी कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, सांगली जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून शिवप्रेमी कला व सांस्कृतिक मंडळ, कुपवाड येथे 4 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. यामध्ये महिला व पुरुष, किशोर व किशोरी गटाचे मिळून 40 संघ सहभागी होणार आहेत.

कुपवाड येथील अकूज ड्रीमलेंड (ता. मिरज जि. सांगली) येथे होणार्‍या स्पर्धेचे उद्घाटन 5 रोजी सायंकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी क्रीडामंत्री संजय बनसोडे, मंत्री, कामगार मंत्री व पालकमंत्री डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे, स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेमध्ये खेळाडू, संघव्यवस्थापक, पंच, संघटना प्रतिनिधी, शासकीय अधिकारी असे एकूण 780 जणं सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, विदर्भ खो-खो असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा खो-खो असोसिएशन यांनी मान्यता दिलेल्या महिलांचे व पुरुषांचे प्रत्येकी 12 संघ सहभागी होतील. तसेच किशोर व किशोरी गटात महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे पहिले पाच, विदर्भ खो-खो असोसिएशनचे पहिले दोन संघ व कोल्हापूर जिल्हा खो-खो असोसिएशनचा एक असे प्रत्येकी 8 असे सोळा संघ सहभागी होतील. महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.

वरील प्रमाणे स्पर्धेसाठी सहभागी होणार्‍या व्यक्तींची निवास व्यवस्था नवकृष्णा व्हॅली स्कूल, कुपवाड, जिल्हा क्रीडा संकुल, सांगली, आप्पासाहेब बिरनाळे हायस्कूल, सांगली, शासकीय वसतिगृहे, शासकीय विश्रामगृहे तसेच सांगली, मिरज व कुपवाड शहरातील लॉजींगमध्ये करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी शासनाने 75 लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. तसेच आमदार सुधीर (दादा) गाडगीळ यांनी आमदार स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपये मंजूर केले आहेत.

या स्पर्धा सकाळ व सायंकाळ या दोन्ही सत्रास प्रकाश झोतामध्ये घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील विजयी, उपविजयी संघांना रोख पारितोषिक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेची तयारी झिबरेडी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुपवाड येथे अंतिम टप्यात आहे. स्पर्धेचा पारितोषीक वितरण कार्यक्रम 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या कालावधीत होईल. या स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी क्रीडा प्रेमी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.नंदूरबार, (क्रि. प्र.), २२ डिसें. : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि नंदूरबार खो-खो असोसिएशन आयोजित राज्यअजिंक्यपद कुमार-मुली खो-खो स्पर्धेत मुली गटात धाराशिवने नाशिकचा तर कुमार गटात सोलापूरने पुण्याचा पराभव करत विजेतेपद पटकावले. सोलापूरने प्रथमच अजिंक्यपदावर मोहर उमटवली आहे.