बोरज टोल नाक्याजवळ दोन ट्रेलरची समोरासमोर धडक; एकजण ठार

खेड:- मुंबई – गोवा महामार्गावर गुरुवारी दि. २५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील बोरज टोल नाक्याजवळ चिपळूण बाजूला दोन ट्रेलरची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की, चालकांचा केबिनमध्ये चेंदामेंदा झाला. अपघातानंतर काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बोरज टोल नाक्याजवळ चिपळूण बाजूला दोन ट्रेलरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भागात गोव्याहून मुंबईकडे जाणारी लेन डागडुजी करण्यासाठी बंद ठेवण्यात आल्याने एकच दुपदरी रस्त्यावर वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारा ट्रक (एम एच ४६ बीयू ६३०२) व गोव्याहून मुंबई कडे जाणारा ट्रेलर समोरा समोर येऊन धडकले. ही धडक एवढी जोरदार होती की मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरचा चालक केबिनमध्ये चिरडून घटनास्थळी ठार झाला. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेलरची चालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर जखमी ट्रेलर चालकाला चिपळूण येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.