राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जिल्हाभरात कार्यक्रम: ना. सामंत

रत्नागिरी:- आयोध्या येथे दि.२२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. या सोहÈयाच्यानिमित्ताने देशभरात जल्लोश केला जाणार आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील १९६ राममंदिरे, ४६६३ ग्रामदेवता मंदिरांवर विद्युत रोषणाई केली जाणार आहे.तर रत्नागिरी शहरात सायंकाळी ४ वाजता राम मंदिर ते मारुती मंदिरमार्गे छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी नगरपरिषद रत्नागिरी व श्रीराम मंदीर ट्रस्ट रत्नागिरी यांच्या संयुक्त विदयमाने सोमवार दि. २२ जोनवारी २०२४ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जयेश मंगल कार्यालय रत्नागिरी व राममंदिर रामआळी रत्नागिरी येथे करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते १ यावेळेत श्रीराममंदिर येथे रामरक्षा पठण होणार आहे. तसेच दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे.

त्यानंतर सायंकाळी ४ वाजता श्रीराम मंदिर, रामआळी येथून शोभायात्रेचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये शहरातील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असून गीतरामायण, वेशभुषा, ढोलपथक, भजन कार्यक्रम इ. सादरीकरण होणार आहे. तसेच रात्री ८ वाजता प्रमोद महाजन क्रिडा संकुल येथे आतषबाजीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. अशा या अभुतपुर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यसाठी रत्नागिरी शहर वासीयांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ना.सामंत यांनी केले आहे.

रत्नागिरी शहराप्रमाणेच मंडणगडम दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर येथेही प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तर नागरिकांनी आपआपल्या घरांवर गुढी उभारुन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार व्हावे असे आवाहन ना.सामंत यांनी केले आहे.