पाच वर्षात जिल्ह्यातील 43 पतसंस्था अवसायनात

रत्नागिरी:- सर्वसामान्य नागरिक पैशांची बचत करुन पैसे पतसंस्थांमध्ये ठेवत असतात. पतसंस्था अवसायनात निघाली तर सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी पतसंस्थांचे कडक लेखा परिक्षण करावं आणि गैरव्यवहार आढळल्यास कडक कारवाई करावी, असे निर्देश सहकार विभागाचे आहेत. त्यानुसार सहकार विभागाकडून केलेल्या लेखापरिक्षणानंतर रत्नागिरी जिल्ह्dयात 2012 ते 2023 या वर्षांच्या कालावधीत 43 पतसंस्थांचा कारभार अवसायानात काढण्यात आला आहे.

ज्या सहकारी बँका आणि पतसंस्था अडचणीत आहेत त्यांची तपासणी केली जात असते. जेणेकरून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी सहकार विभागामार्पत कार्यवाही केली जात असते. सहकार विभागाने कामकाज बंद असलेल्या संस्थांचे सर्व्हेक्षण केले जाते. त्यानुसार जिह्यातील विविध प्रकारातील संस्थांचे सर्व्हेक्षणानंतर संबधित पतसंस्थांना अंतरिम नोटीस बजावली जाउन त्यानंतर ती पतसंस्था अवसायानात काढण्याची कार्यवाही सहाय्यक उपनिबंधक कार्यालयामार्पत केली जाते.
शासनामार्पत 2014 पासून सहकार शुद्धीकरणाची मोहीम हातात घेण्यात येउन राज्यातील हजारो संस्था अवसायनात निघाल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने वेळोवेळी ही सहकार शुद्धीकरण मोहीम हातात घेतली जात आहे. सहकार विभागाने पतसंस्था सर्व्हेशनाचे आदेश जिल्हा निबंधक कार्यालयाला दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या संस्थांचे सर्वेक्षणात संस्थांची जागेवर जाऊन माहिती घेण्यात आल्या. त्यात संबधित संस्थांना अंतरिम नोटिसा काढण्यात येउन अवसायनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. तसा अहवाल सहकार विभागाकडे पाठवण्याची कार्यवाही केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील आतापर्यंत 47 सहकारी पतसंस्थांचे कारभार अवसायानात काढण्यात आल्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हा सहय्यक उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी सांगितले. त्यामध्ये 29 बिगरशेती सहकारी पतसंस्था, 8 नागरी सहकारी पतसंस्था, 4 सेवक सहकारी आणि एक संचयकार सहकारी पतसंस्थांचा समावेश आहे. त्यामध्ये मंडणगड तालुका 2, दापोली तालुका 6, खेड तालुका 1, चिपळूण 10, गुहागर तालुकाग 4, संगमेश्वर तालुका 5, रत्नागिरी तालुका 8, लांजा 4, राजापूर तालुका 3 सहकारी पतसंस्थांचा समावेश आहे.
अवसायानातील आदेश काढलेल्या संस्थांची नावेः नवजीवन ग्रामीण बिगरशेती देव्हारे, त्रिमूर्ती ग्रामीण बिगरशेती देव्हारे, शिवसमर्था पालगड, मैत्रेया ग्रामीण गिम्हवणे, जिजामाता ग्रामीण, दापोली, इंदिरा ग्रामीण बुरोंडी, खेमराज ग्रामीण हर्णे, जनहित ग्रामीण उन्हरे-दापोली, सुभद्रा ग्रामीण चिरणी खेड, विश्वकर्मा ग्रामीण खेर्डी, श्री दत्त ग्रामीण खेर्डी, तोंडली पिलवली ग्रामीण, शंकराव कनावजे ग्रामीण पिंपळी, चिपळूण मुस्लिम महिला नागरी, पंचशिल मागासवर्गी ग्रामीण, कळंबस्ते, खेर्डी ग्रामीण सहकारी, चिपळूण तालुका सहकारी सेवक, महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती, सुवर्णभास्कर नागरी सहकारी, श्री देवी व्याघ्रांबरी ग्रामीण, वेळणेश्वर नागरी सहकारी, हेरंबसाई ग्रामीण बिगरशेती कोंडकारूळ, अर्थगंगा ग्रामीण बिगरशेती पडवे, कडवई ग्रामीण तुरळ, श्री मंगल ग्रामीण बिगरशेतील माखजन, सह्याद्री ग्रामीण बिगरशेती निवेखुर्द, मातृमंदिर सेवक सहकारी देवरुख, जयभवानी ग्रामीण बिगरशेती नेवरे, बहुजन नागरी पतसंस्था रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा पगारदार सेवक रत्नागिरी, लोकमान्य नागरी सहकारी, विकास बँक सेवक सहकारी पतपेढी, ऐक्यवर्धक ग्रामीण बिगरशेती शिरगाव, पबुध्द ग्रामीण बिगरशेती चाफे, पंचशिल नागरी शिवाजीनगर, शिपोशी इनामदार लांजा नागरी, पुनस पंच ग्रामिण बिगरशेतील्। शिपोशी ग्रामीण बिगरशेती, रविंद्र नागरी सहकारी, शिवशंकर ग्रामीण बिगरशेतील वाटुळ, कमल नागरी सहकारी राजापूर, राजापूर तालुका संचयकारी सहकारी.