स्थानिक बाजारपेठेत खरेदीदारांना लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी

रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे आयोजन; खरेदीची महास्पर्धा

रत्नागिरी:- सणासुदीला जास्तीत-जास्त ग्राहकांना स्थानिक बाजारपेठेत आकर्षित करण्यासाठी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने खरेदीची महास्पर्धा आयोजित केली आहे. शहरातील सुमारे दीडशे दुकाने या खरेदीच्या महास्पर्धेत सहभागी झाले आहेत. या दुकानातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दुचाकी,
लॅपटॉप, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन, सायकल, स्मार्टवॉच यांसारखी लाखो रुपयांची बक्षिसे
जिंकण्याची संधी मिळणार आहे.

दोन वर्षापूर्वी देखील व्यापारी महासंघाने अशाच एका स्पर्धेचे आयोजन केले होते. यात अमोल कळंबटे,
झरेवाडी रत्नागिरी या ग्राहकाला चारचाकी गाडी बक्षीस मिळाली होती. शिवाय इतर अनेक ग्राहकांना देखील लाखो रुपयांची बक्षिसे मिळाली होती. याच पद्धतीने या वर्षी देखील दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बक्षिसे जिंकण्याची नामी संधी मिळणार आहे. या महास्पर्धेत जास्तीत जास्त ग्राहकांनी भाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

ऑनलाईन खरेदीसह मोठ-मोठी खरेदीचे दालने उघडल्यामुळे स्थानिक बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम होत आहे. स्थानिकांच्या गरजांचा विचार करून येथील व्यापाऱ्यांची लवचिक भुमिका असते. आर्थिक अडचणीत असलेल्या ग्राहकांनाही स्थानिक व्यापाऱ्यांकडुन सवलत दिली जाते. त्यामुळे ग्राहकांनी स्थानिक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडुन खरेदी करावी आणि बक्षिसांची लयलुट करावी, असे दुहेरी आवहान व्यापारी संघाने केले आहे.