लाचखोर आरोग्य सहाय्यकाला एक दिवसाची पोलीस कोठडी

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लाचखोर आरोग्य सहाय्यकाला बुधवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.मंगळवारी सकाळी रत्नागिरीतील एका हॉटेलमध्ये त्याला 15 हजार रुपयांची लाच घेताना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले होते.

शैलेश आत्माराम रेवाळे (38,रा.रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोग्य सहाय्यकाचे नाव आहे.तक्रारदाराला त्यांच्या मालकीच्या बांधकामाकरता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील ना हरकत दाखल मिळण्यासाठी त्यांनी अर्ज तयार केला होता.तो तयार केलेला अर्ज स्विकारण्यासाठी व त्याबाबतचे कामकाज पूर्ण करुन ना हरकत दाखला देण्यासाठी शैलेशने त्यांच्याकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मंगळवार 31 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथील एका हॉटेलमध्ये आरोपी शैलेश रेवाळेला लाचेची रक्कम स्विकारताना पंचा समक्ष रंगेहात पकडण्यात आले होते.