खेड बोरज मध्ये तौक्ते वादळाचे 2 बळी; तुटलेल्या विद्युतभारीत तारेचा स्पर्श झाल्याने ओढावला मृत्यू 

खेड:-खेड तालुक्यातील बोरज घोसाळकर वाडी नजीक सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास तौक्ते वादळामुळे तुटलेल्या 33 के. व्ही. च्या विद्युत भारीत तारेचा स्पर्श झाल्याने वृद्ध दांपत्याचा जागीच मृत्यू झाला 
 

प्रकाश गोपाळराव घोसाळकर व वंदना प्रकाश घोसाळकर (रा. घोसाळकर वाडी, बोरज ) हे सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एच 08 ए एच 5083 वरून आपल्या घरी परतत असताना वाडी नजीक तुटलेल्या 33 के. व्ही. विद्युत भारीत  तारेचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसल्याने ते जमिनीवर कोसळले व जागीच मृत्यू झाला.
 

या घटनेचे प्रत्यक्ष दर्शी ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तातडीने  या घटनेची माहिती महावितरण कार्यालयात दिली व विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगितले. त्यामुळे संभाव्य धोका टळला. या घटनेची माहिती मिळताच खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी शशी किरण काशीद, सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने भेट देऊन पंचनामा करून मृतदेह कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. महावितरणचे सहायक अभियंता कौस्तुभ बर्वे, कासार आदींनी कर्मचाऱ्यांसह भेट दिली. यावेळी  सभापती मानसी जगदाळे, उप सभापती जीवन आंब्रे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र आंब्रे,  प्रभारी सरपंच विशाल घोसाळकर आदींनी भेट देऊन पाहणी केली.