अडीच महिन्यात 225 फेरीवाले कोरोना पॉझिटिव्ह 

रत्नागिरी:-  कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित प्रत्येकाची कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. मागील अडीच महिन्यात 4 हजार 800 फेरीवाल्यांची चाचणी करण्यात आली. यात 225 फेरीवाले पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येतही हळूहळू घट झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात असलेला कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे 94 टक्के इतके पोहचले आहे. रत्नागिरी शहरात वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या प्रसाराला रोखण्यासाठी प्रशासनस्तरावरून फिरत्या तपासणी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.  
 

या पथकामार्पत शहरातील व्यापारी, फेरीवाले, हातगाडीवाले, भाजीवाले, झोपडपट्टी, इतर नागरिकांचीही तपासणी ती देखील पत्यक्ष जाग्यावर केली जात आहे. त्यासाठी पथकातील कर्मचाऱ्यांना योग्य त्या तपासणी साधने पुरवण्यात आली आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून शहरात पथकामार्फत फिरती कोरोना तपासणी केली जात आहे. या मोहिमेत आतापर्यत सुमारे 4 हजार 800 हून अधिक लोकांची तपासणी प्रत्यक्ष जागेवर करण्यात आली आहे. त्यामध्ये गेल्या अडीच महिन्यात 200 हून अधिक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे या पथकातील कर्मचाऱ्यांमार्फत सांगण्यात आले. त्यासाठी जिल्हा प्रशासनन, आरोग्य विभाग, नगर परिषद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.