दापोलीत चिमुरडीवर अतिप्रसंग; एकास अटक

दापोली:-दापोली तालुक्यातील भौंजाली येथे चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली. संशयित ४० वर्षीय आरोपीला दापोली पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला २० जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली शहरानजीक असणाऱ्या भौंजाली गावात संशयित आरोपी सुरेश नारायण कुंबेटे याच्या अंगणात शेजारील चार वर्षीय चिमुरडी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास खेळायला आली होती. तिला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले.

दरम्यान मुलीला त्रास होत असल्याने सदरची घटना त्या चिमुरडीने आपल्या पालकांना सांगितल्यावर त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात संशयित सुरेश कुंबेटे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक करंजकर करत आहेत.