रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि परिसरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील 24 तासात रत्नागिरी तालुक्यात 14 रुग्ण सापडले असून यातील पाचजण स्थानिक आहेत.
सापडलेल्या पाच कोरोना बाधित रुग्णांमध्ये 1 डॉक्टर, 1 जेल पोलीस, 1 आरोग्य सहाय्यक यांच्यासह अन्य दोन जणांचा समावेश आहे. सापडलेले रुग्ण एमआयडीसी, जेल क्वाटर्स, फणसोप, राजीवडा या भागासह संस्थात्मक विलीगिकरण केलेल्या रुग्णांचा समावेश आहे.