रत्नागिरी:- एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे गणेशोत्सवासाठी चाकमन्यांच्या प्रवेशावरून सध्या कोकणातलं वातावरण ढवळलं गेलं आहे. मात्र असं असली तरी सध्या कोकणातल्या चित्र शाळांवर त्याचा फारमोठा परिणाम झालेला नाही. उलट सध्या कोकणातल्या चित्रशाळेत सध्या मुर्तीकारांची लगबग दिसून येत आहे.
पण सध्या दोन फुटांपासून ते चार फुटांपर्यतच गणेशमुर्ती शाळेत गणपतीच्या देखण्यामुर्ती साकारल्या जातायत. कोरोनाच्या संकटामुळे सरकारकडून गणेश मूर्तींच्या उंचीवर बंधणं आली आहेत. त्यामुळे गणेशचित्र शाळेत चार फुटांच्यावर मुर्ती साकारल्या जात नाहीयेत. तर दुसरीकडे मुर्ती हलकी असावी म्हणुन मुर्तीकार सध्या कमी वजनाच्या मुर्तींसाठी नारळाचा काथ्या वापरून मुर्तीचे वजन कमी करण्याचा प्रयत्न करतायत. कोरोनाचे संकट असलं तरी मुर्ती घडवण्याची आँर्डर काही कमी झालेली नाही. एकूणच सध्या मूर्ती शाळांमध्ये लगबग असलेली पाहायला मिळत आहे