रत्नागिरी:– गुरुवारी सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 11 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 81 झाली आहे.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथील 2 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय कामथे येथील 9 रुग्ण आहेत. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला असून त्याची माहिती अप्राप्त आहे .त्यामुळे कोरोना बाधित मृतांची संख्या 38 झाले आहे.