जिल्ह्यात चोवीस तासात कोरोनाचे 60 नवे रुग्ण

रत्नागिरी:- मागील 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात 60 नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 130 झाली आहे. आजपासून ॲन्टीजेन टेस्टला सुरुवात झाली असून  यामध्ये एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान 17 रुग्णांना  बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.  यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 682  झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 1, कोव्हिड केअर सेंटर घरडा, लवेल येथून 12 आणि  4 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत. 

नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी येथील 11 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय, कामथे 18 रुग्ण, गुहागर 26 रुग्ण, दापोली  3, घरडा, खेड  1 (यामुळे घरडा केमिकल्स मधील एकूण पॉझिटिव्हची संख्या 82 झाली) आणि ॲन्टीजेन टेस्ट – 1 रुग्ण समावेश आहे.