रत्नागिरी:- खेडशी माध्यमिक शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या श्री महालक्ष्मी ज्युनियर कॉलेजने बारावीच्या निकालात घवघवीत यश संपादन केले. कॉलेजचा 12 वी कला शाखेचा निकाल 83.33 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 97.49 टक्के लागला आहे.
कला शाखेमध्ये प्रथम कु.निलम दादासो गडदे हिने 75.07 टक्के घेत प्रथम, रुतुजा रत्नकांत कांबळे हिने 71.84 टक्के घेत द्वितीय, गौरी हरिश्चंद्र चव्हाण 67.23 टक्के घेत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच वाणिज्य शाखेत सोनाली सुभाष घवाळी हिने 80 टक्के घेत प्रथम, रुतुजा रविंद्र शिंदे हिने 78.61 टक्के मिळवत द्वितीय, तर संकेत सुरेश कुळ्ये 78.30 टक्के घेत तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल खेडशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर भार्गव सावंतदेसाई, उपाध्यक्ष अविनाश पांडूरंग सावंतदेसाई, कार्याध्यक्ष दत्तात्रय अनंत सावंत, सचिव सचिन प्रकाश सावंतदेसाई, सहसचिव जयप्रकाश दत्तात्रय सावंतदेसाई, खजिनदार शैलेद्र मोहन सावंतदेसाई, शालेय समिती अध्यक्ष सचिन अशोक सावंतदेसाई, आणि प्राध्यापक वर्ग यांचे हार्दिक अभिनंदन केले तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.