रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला असताना कोरोना सोबत आता ‘सारी’ तापानेही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 61 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 49 जणांना सारी रोगाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत या रोगाने 9 जणांचा बळी घेतला आहे तर यातील 11 जण कोरोना बाधित निघाले आहेत.
जिल्हा रूग्णालयाने शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविलेल्या अहवालात सारी तापाने 9 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर जिल्हा शासकीय रूग्णालयात सारी ताप आलेले 61 जण दाखल झाले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यापैकी 49 जणांना सारीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सारी तापाच्या आजारात जंतूसंसर्ग होऊन फुफ्फुसातील दाब वाढतो. फुफ्फुसाला सूज येते.
न्युमोनिया होऊन रक्तात ऑक्सीजन शिल्लक रहात नसल्याने मेंदू, हृदय, किडनी निकामी होतात. शरीरात जंतूसंसर्ग झाल्याने आजाराचे निदान वेळेवर होत नाही. तापाचे जीवाणू, विषाणू रक्तात मिसळतात. रक्त तपासणीनंतरही आजाराचे निदान होत नाही. विषाणू अतिशय सुक्ष्म असल्याने तपासणीत दिसत नाही. माणसाचे हृदय काम करीत नसल्याने फुपÌफुसे बंद पडून हृदय, किडनीवर त्याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.