जिल्ह्यात 21 नवे कोरोना बाधित; तीन रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:- गुरुवारी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 21 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 70 झाली आहे.

दरम्यान 10 रुग्णांना  बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 665  झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 9 आणि  1 समाजकल्याण रत्नागिरी  मधील आहेत.

कोरोनचा हॉटस्पॉट असलेल्या खेडमधील घरडा कंपनी  येथील आज 21 कोरोना पाॅझिटीव्ह आहेत. यामुळे घरडा केमिकल्स मधील एकूण पॉझिटिव्हची संख्या 81 झाली
       

घुडेवठार, रत्नागिरी येथील 56 वर्षीय  कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. सदर रुग्णाची बायपास सर्जरी झाली होती. उपचारा दरम्यान त्याचा  मृत्यू झाला. दुसरा मृत्यू झालेला रुग्ण हा मिरजोळे, एमआयडीसी, रत्नागिरी येथून असून त्याचे वय 65 वर्षे होते. उपचार दरम्यान मृत्यू झाला. तर एक रुग्णाची माहिती अप्राप्त आहे. त्यामुळे कोरोना बाधित मृत्यूंची संख्या आता  37 झाली आहे.