रेड अलर्ट; 89 नवे रुग्ण, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 1049

आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू; एकूण 34 बळी

रत्नागिरी:- मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झालेले असताना बुधवारी जिल्ह्यात एकाचवेळी 89 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यापैकी रत्नागिरी तालुक्यात 13 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 1049 झाली आहे.
 

नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 13 रुग्ण यासह कळंबनीतील 17, खेड 20, कामथे 19, संगमेश्वर 3, गुहागर 10 आणि दापोलीतील 7 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. बुधवारी सायंकाळी एकाचवेळी 89 रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे.
 

कोरोनाला अटकाव व्हावा यासाठी जिल्ह्यात 1 ते 8 जुलै तर नंतर 15 जुलै पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र या लॉकडाऊच्याच कालावधीत जिल्ह्यात सर्वाधिल कोरोना बाधित रुग्ण सापडून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

आडे, दापोली येथील 62 वर्षीय महिला कोरोना रुग्णांचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बाधित मृत्यूंची संख्या आता 34 झाली आहे.