दोन पोलीस, दोन नर्सिंग विद्यार्थिनींना कोरोनाची लागण; रत्नागिरी तालुक्यात 13 नवे रुग्ण

रत्नागिरी:- बुधवारी जिल्ह्यात तब्बल 89 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली. रत्नागिरी तालुक्यात देखील 13 रुग्ण सापडले असून यात दोन पोलीस कर्मचारी, 2 नर्सिंगच्या विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली आहे. यासह एमआयडीसीतील ‘त्या’ कंपनीतील आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  

रत्नागिरी तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात 80 ऍक्टिव्ह कंटेन्मेंट झोन यापैकी 18 झोन रत्नागिरी तालुक्यात आहेत. मागील काही दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि तालुक्यात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
 

दरम्यान बुधवारी सापडलेल्या 13 रुग्णांमध्ये 2 पोलीस कर्मचारी आहेत. तर दोन नर्सिंग विद्यार्थिनींचा सामवेश आहे. यासह एमआयडीसी येथील कंपनीतील आणखी 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. नव्याने सापडलेल रुग्ण नर्सिंग हॉस्टेल, जुवे, कसोप, अभ्युदय नगर, आयटीआय नजिक रनप कर्मचारी वसाहत, शिरगाव, आझाद नगर, सौभाग्य नगर, जेल वसाहत आणि दोन संस्थात्मक क्वारंटाईन मधील रुग्णांचा समावेश आहे.