एसटी, दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

दापोली: – दापोली शहरानजीक असलेल्या वळणे काजू फॅक्टरीजवळ सकाळी मोटरसायकल व एसटी बसमध्ये झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.मीनाक्षी बोर्जे (वय-45) व आकाश बोर्जे- (21) अशी अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला.

दापोली तालुक्यातील वळणे एमआयडीसी पुलालगत सदर अपघात झाला. दाभोळ गावाहून दापोलीकडे राज्य परिवहन महामंडळाची बस अडीच वाजण्याच्या सुमारास वळणे एमआयडीसीच्या पुला जवळ आली. यावेळी दापोलीकडून वळणे गावाकडे जाणारे मीनाक्षी बोर्जे व आकाश यांच्या दुचाकी गाडीला या दाभोळ दापोली बसने जोरदार धडक दिली. ही धडक दिल्यानंतर त्यांच्या मागून येणाऱ्या देवके येथील विलास गोरीवले वय 60 व निलेश गोरीवले- वय 35 यांची दुचाकी या अपघातग्रस्त गाड्यांवर येऊन आदळली. यावेळी एसटी चालकाने दोन्ही गाड्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला व गाडी लगतच्या शेतात उतरवली. मात्र तोपर्यंत बोर्जे आई व लेकाच्या दुचाकीची धडक बसला बसून दोघेही जागीच ठार झाले.