रत्नागिरीत कोरोनाचे आणखी तीन रुग्ण


रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असताना रत्नागिरी तालुक्यात आणि शहरात कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्याने चिंतेचा विषय असताना रत्नागिरी शहर आणि परिसरात 3 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. नव्याने आलेल्या अहवालात रत्नागिरी येथील 3 यात 1 कर्ला, 1 गुढेवठार आणि 1 एमआयडीसी त कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे.
 

याशिवाय लांजा येथील 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले, यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 960 झाली आहे. आज रात्री नऊ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार बरे झालेल्या रुग्णांची संख्या 634 आहे तर 33 जणांचा मृत्यू झाला असून एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 293 आहे.