आणखी एक डॉक्टर कोरोना बाधित 

रत्नागिरी:- रत्नागिरीत आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. मागील चार दिवसांपासून ताप येत असल्याने संबंधित डॉक्टरने कोरोनाची चाचणी केली होती. याचा अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाला असून त्या डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर त्या डॉक्टरला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 

या आधी देखील जिल्ह्यात डॉक्टरना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यापूर्वी डॉक्टर्स डे दिवशीच डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर डॉक्टरसह आरोग्य कर्मचारी देखील कोरोना बाधित आढळून आले होते. 
 

दरम्यान सोमवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरीत दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. यातील एकजण डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाले. मूळचा टीआरपी येथील या डॉक्टर चे राजीवडा येथे क्लिनिक आहे. परंतु डॉक्टर मागील आठ दिवस घरीच असल्याने नेमकी कोरोनाची लागण झाली कशी याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे.